आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेष

या जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु!

रायगड जिल्ह्यात “आपले सरकार सेवा केंद्र (Aapale Sarkar Seva Kendra)” सुरू करण्यासाठी, अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. . अर्जदार यांनी नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज भरणे अनिवार्य आहे.

आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु! Aapale Sarkar Seva Kendra Raigad:

आवश्यक कागदपत्रे

१. ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत अनिवार्य

२. आधार कार्ड

३. पॅन कार्ड

४. सी.एस.सी. / टी.ई.सी. प्रमाणपत्र

५. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (Police Clearanace Certificate)

६. शैक्षणिक प्रमाणपत्र

७. संगणकीय प्रमाणपत्र

८. जागेचे कागदपत्र (जागा स्वतःच्या मालकीची असल्यास असेसमेंट दाखला किंवा लगतच्या वर्षाची घरपट्टी (Property Tax) भरल्याची पावती. तसेच जागा भाड्याची असल्यास नोंदणीकृत भाडे करारपत्र.

९. अर्जदार अपंग असल्यास त्यासंबधीचे प्रमाणपत्र.

अटी व शर्ती

१. अर्ज मंजूर करणे किंवा नामंजूर करणे याचा अधिकार अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती तथा जिल्हाधिकारी, रायगड यांचेकडे असतील.

२. अर्जदार यांनी नवीन आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्रासाठी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज भरणे अनिवार्य आहे.

३. अजर्दार यांनी https://raigad.gov.in या संकेतस्थळा वरून ऑनलाईन अर्ज भरण्यात यावा. सदरचा अर्ज Submit केल्यानंतर आपण नमूद केलेल्या इमेल आयडी वरती प्राप्त झालेल्या अर्जाची प्रत ऑफलाईन अर्ज सोबत जोडणे अनिवार्य आहे. सदर ऑनलाईन अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रे सोबत जोडलेली नसल्यास आपला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

४. अर्जदार अंपग असल्यास प्राधान्य देण्यात येईल. (प्रमाणपत्र असणे अनिवार्य)

५. आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्राची जागा रिक्त आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी https://raigad.gov.in या संकेतस्थळा वरून रिक्त केंद्राची यादी डाउनलोड करून पाहण्यात यावी. रिक्त नसलेल्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्राची मागणी प्राप्त झाल्यास सदरचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. ६. Online व Offline अर्जामधील संपुर्ण माहिती भरणे अनिवार्य आहे. तसेच मागणी अर्ज मध्ये नमूद असलेले सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत सोबत जोडणे अनिवार्य आहे.

७. सर्व कागदपत्रावर स्वतःची स्वाक्षांकित (Self-Attested) असणे आवश्यक आहे नसल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल.

८. आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी प्रथम आपल्याकडे CSC (Common Service Center) असणे आवश्यक आहे.

९. CSC (Common Service Center) केंद्र नसल्यास नवीन अर्ज करण्याचे असल्यास https://register.csc.gov.in संकेतस्थळावरती ऑनलाइन अर्ज करण्यात यावा. सदरचे संकेतस्थळ बाबत किंवा अजर्दार यांनी केलेल्या अर्जाबाबत काही शंका/तक्रार असल्यास जिल्हा समन्वयक, CSC (Common Service Center) यांच्याशी संपर्क साधण्यात यावा.

१०. अर्जदार यांच्या कडे CSC केंद्र नसल्यास अर्जदार CSC केंद्र घेण्यास भौगोलिक दृष्ट्या पात्र ठरत असल्यास म्हणजे मुद्दा क्र. ९ नुसार नवीन CSC केंद्रासाठी अर्ज केलेले आहे त्या अर्जाची ऑनलाइन येणारी अर्ज पावती (TEC Certificate) आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्र मागणी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

११. अर्जदार आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्रासाठी पात्र ठरल्यास अर्जामध्ये नमूद असलेल्या जागेवरच केंद्र सुरु करणे अनिवार्य आहे.

१२. सदरचा अर्ज दिनांक १५/०५/२०२५ रोजी साय. ०६.१५ वा. पर्यंत नोंदणी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे प्राप्त होणे आवश्यक आहे.

नवीन आपले सरकार सेवा केंद्राकरीता अटी व शर्थी 

१. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

२. अर्जदार किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

३. महाराष्ट्र शासन, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग, शासन निर्णय क्रमांक मातंस २०१२/प्र.क्र.२७७/३९ दिनांक ०४/०२/२०१३ नूसार अर्जदाराने संगणक ज्ञानाबाबतचे MSCIT / D.O.Ε.Α.C.C. / N.E.I.L.I.T. प्रमाणपत्र किंवा शासन निर्णयातील नमूद इतर संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

४. संबंधित अर्जदार यांना जिल्हयामध्ये (शहरी किंवा ग्रामीण भागात) फक्त एकाच ठिकाणी नव्याने आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करता येईल. जाहिरात दिनांकावेळी कार्यरत असलेल्या आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्रचालक यांना दुसऱ्या नविन केंद्रासाठी अर्ज करता येणार नाही.

५. केंद्र व राज्य शासनाचे शासकीय / निमशासकीय / सार्वजनिक उपक्रमे । महामंडळे यांचे शासकीय सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्रासाठी अर्ज करता येणार नाही.

६. ज्या केंद्र चालकांवर यापूर्वी प्रशासनामार्फत कारवाई करण्यात आलेली असेल अशा केंद्रचालकांना नविन आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्रासाठी अर्ज सादर करता येणार नाही.

७. विवाहीत स्त्रियांनी विवाहापूर्वीचे व विवाहानंतरचे नाव अशा वेगवेगळया नावाने अर्ज न करता केवळ विवाहानंतरच्या नाव व पत्त्यानूसार अर्ज करावा.

८. ग्रामपंचायत / नगरपंचायत / नगरपरिषद भागात नव्याने येणाऱ्या यादीमधील नमूद ग्रामपंचायत / नगरपंचायत / नगरपरिषद साठीच अर्ज सादर करावा. इतर ठिकाणासाठी मागणी केलेस अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

9. आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्रासाठी अर्ज करणारा व्यक्ती हा त्या ग्रामपंचायत / नगरपंचायत / नगरपरिषद च्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवाशी असावा. अर्जदाराने रहिवास पत्त्याचा पुरावा म्हणून मिळकत कर पावती, लाईट बील, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, ग्रामपंचायत कडील रहिवासी दाखला, पासपोर्ट यापैकी कोणतेही दोन पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

10. अर्जदार यांना अर्ज भरण्याबाबत काही अडचणी असल्यास त्यांनी कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागाकडील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक व जिल्हा समन्वयक यांचेकडून अधिक माहिती प्राप्त करुन घ्यावी. इतर त्रयस्थ व्यक्तीमार्फत अर्ज सादर करु नये तसे निदर्शनास आल्यास अर्ज अपात्र ठरविणेत येईल.

11. परिपूर्ण भरलेला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग (सामान्य शाखा) येथील सेतू संकलनाकडे दिनांक 16/04/2025 ते 15/05/2025 या कालावधीत शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत समक्ष सादर करावेत. इतर कोणत्याही मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोद घ्यावी.

12. जिल्हाधिकारी यांचे अधिनस्त असलेल्या समितीस अर्ज छाननीबाबत सर्व अधिकार असतील.

13. प्राप्त अर्जापैकी कोणता अर्ज स्वीकारायचा, कोणता अर्ज नाकारायचा किंवा संपूर्ण प्रक्रिया कोणतेही कारण न देता रदद करणेचे अधिकार अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती, तथा जिल्हाधिकारी, रायगड यांचेकडे राखून ठेवणेत आले आहेत.

14. ज्या व्यक्तीस आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्र मिळेल त्याला ते केंद्र दुसऱ्या व्यक्तीला चालविण्यास देता येणार नाही.

15. CSC ID अस्तित्वात असणा-या B२C सेवा देणा-या केंद्र चालकांनी अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य क्रमाने आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्र देण्यात येईल. सदर केंद्र चालकांनी जाहिरनाम्याच्या दिनांकापूर्वीचे CSC प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे

16. एका जागेसाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास मागील 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये B2C चे अधिक व्यवहार केले असतील अशा केंद्रचालकांना प्राधान्य क्रमाने आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्र देण्यात येईल.

17. उमेदवार हा गुंतवणूकीचे दृष्टीकोणातून सक्षम असला पाहीजे.

18. उमेदवाराने संगणक साहित्य व इतर अनुषंगीक साहित्य व जागा उपलब्ध असलेबाबत योग्य तो तपशिल जोडणे आवश्यक आहे.

19. महाराष्ट्र शासन, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्र. मातंसं- 1716/प्र.क्र.517/39, दिनांक 19 जानेवारी 2018 मधील आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्र स्थापन करण्याचे निकष, कार्यपध्दती, सुविधा, कर्तव्ये व जबाबदाऱ्या, कारवाई इ. बाबीस अधीन राहून केंद्र कार्यान्वित केले जाईल. तसेच वेळोवेळी प्रसिध्द होणारे शासन निर्णय/परिपत्रक शुध्दीपत्रकात दिलेल्या सूचनांची काटेकारेपणे अंमलबजावणी करणे केंद्रचालक यांना बंधनकारक राहील. त्याचा भंग केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्र बंद करणेत येईल.

20. आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्रधारक म्हणून पात्र ठरल्यास महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक- मातंसं 4719/प्र.क्र.33/से-5/39 दिनांक 11 सप्टेंबर, 2019 अन्वये, संबंधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सोबत सादर करणे बंधनकारक राहील. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करु नये.

21. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालू ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक केंद्रावर दर्शनी भागात प्रसिध्द करणे, तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे, शासनाने पुरविलेल्या आज्ञावलीचाच (software) इ. योग्य वापर, संरक्षण, व जतन करणे बंधनकारक राहील.

22. आपले सरकार सेवा केंद्र (Aapale Sarkar Seva Kendra) हे केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिसूचित ठिकाणीच चालविणे क्रमप्राप्त आहे. केंद्राचे ठिकाण बदलण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास गंभीर स्वरुपाची चूक समजून केंद्र रदद करणेत येईल.

23. आपले सरकार सेवा केंद्राना शासनाचे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी देण्यात येणारे निर्देशांचे पालन करावे लागेल. तसेच उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागेल तसेच त्यांना केंद्राबाबत मागविलेला अहवाल तात्काळ सादर करावा लागेल.

24. शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या सेवा आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्रातून ऑनलाईन पध्दतीने आणि नियमानुसार देणे अनिवार्य राहील. याबाबत नागरीकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास त्यांची गंभीर दखल घेण्यात येईल व चौकशी करुन कार्यवाही करण्यात येईल.

25. अर्जामध्ये भरलेली माहिती चुकीची आढळल्यास अर्जातील माहिती व अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे यामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड / तफावत आढळून आल्यास त्यांचा अर्ज रदद करण्यात येईल.

26. आपले सरकार सेवा केंद्र (Aapale Sarkar Seva Kendra) नव्याने देणेबाबत कोणत्याही प्रकारची शासकीय फी स्वीकारली जात नसून संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. याकामी त्रयस्थ व्यक्तीबरोबर अर्थिक व्यवहार झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.

27. आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्रावर ई-वॉलेट मार्फत सर्व सेवा शुल्काचा भरणा करण्याचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करुन देणे आवश्यक असेल. तसेच, राज्य शासनामार्फत डिजिटल पेमेंट प्रणालीला चालना देण्यासाठी देण्यात येणाऱ्या सूचना (उदा. POS यंत्र, Paytm, BHIM App इ. प्रणालींचा वापर) करणे बंधनकारक राहील.

28. आपले सरकार सेवा केंद्रामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करीत असताना नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवेबाबतची विहित नमुन्यातील पावती देणे व त्याची नक्कल पावती सुस्थितीत ठेवणे तसेच सेवा पूर्णपणे वितरित केल्यानंतर सदर एक पावती मूळ प्रकरणाला / अर्जाला लावणे, सर्व नोंदवहया अद्यावत व सुस्थितीत ठेवणे हे केंद्रचालक यांचेवर बंधनकारक राहील.

29. आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्रामधून वितरीत होणाऱ्या सेवेबाबत VLE MIS अहवाल, निर्गत केलेल्या दाखल्याच्या प्रमाणपत्राच्या स्थळप्रती प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय यांचेकडे सादर करणे केंद्रचालक यांचेवर बंधनकारक राहील.

30. आपले सरकार सेवा केंद्राकरिता कोणत्याही शासकीय परिसरामध्ये जागा मिळणार नाही याची अर्जदाराने दक्षता घ्यावी.

31. शासनाने ठरवून दिलेले ब्रेडिंग चा वापर करणे तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने स्थापन केलेल्या हेल्पलाईन क्रमांकाचा तपशील आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिध्द करणे केंद्रचालक यांचेवर बंधनकारक राहील.

32. आदर्श आपले सरकार सेवा केंद्र उभारणेसाठीचे निकष व रचना याबाबतचे TYPE PLAN नूसार आपले सरकार सेवा केंद्राची रचना करणे केंद्रचालक यांना बंधनकारक राहील.

33. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या ठिकाणीच आपले सरकार सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्र मंजूर करण्यात येईल. प्रक्रियेच्या कोणत्याही क्षणी जाहिरातीमधील देय आपले सरकार सेवा केंद्राच्या संख्येत वाढ अथवा घट करणेचे अधिकार अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती, तथा जिल्हाधिकारी, रायगड यांचेकडे राखून ठेवणेत आले आहेत.

34. अर्ज सादर केल्यानंतर अर्जदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी / अधिकारी यांचेवर आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करणेकरिता कोणत्याही प्रकारचा दबाव आणणेचा प्रयत्न करु नये. अशी बाब निदर्शनास आल्यास कोणतेही कारण न देता अर्जदारास आपले सरकार सेवा केंद्र निवड प्रक्रियेतून अपात्र करणेत येईल याची नोंद घ्यावी.

35. वरील सर्व अटी व शर्ती केंद्रचालक यांचेवर बंधनकारक असून याबाबत भविष्यात केंद्रचालक यांची कोणतीही कायदेशीर तक्रार राहणार नाही तसेच केलेल्या कारवाई बाबत कोणत्याही न्यायालयात दाद मागता येणार नाही.

या लेखात, आम्ही आपले सरकार सेवा केंद्रासाठी (Aapale Sarkar Seva Kendra Raigad) अर्ज विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

जाहिरात (Notification) व ऑफलाइन अर्ज (Application Form): जाहिरात व ऑफलाइन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढील लेख देखील वाचा!

  1. आधार सेंटर सुरु करण्यासाठी ऑपरेटर/पर्यवेक्षक सर्टिफिकेट ऑनलाईन काढण्याची प्रोसेस!
  2. CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज!
  3. CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन TEC कोर्स !
  4. आधार अपडेट सेंटरसाठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (CSC Aadhaar UCL Center)
  5. ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्रचालक (ऑपरेटर)साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
  6. CSC ट्रान्सपोर्ट पोर्टल नवीन पोर्टल सुरु; आता CSC सेंटर मध्ये होणार RTO ची सर्व कामे ! – CSC Transport Services
  7. CSC सेंटर मध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि त्यांच्या वेबसाईट लिंक!
  8. CSC VLE साठी सुवर्ण संधी; रिटेल मेडिकल स्टोअर उघडू इच्छिता? मग अशी करा ऑनलाईन नोंदणी!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.