सहकारी गृहनिर्माण संस्था नांव राखून ठेवणे, नोंदणी करणे बाबत सविस्तर माहिती !
नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नांव राखून ठेवणे व बँकेत खाते उघडणे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नोंदणीची प्रक्रिया नोंदणीपूर्वी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजापासून सूरु होते. या सभेत प्रामुख्याने मुख्य प्रवर्तकांची निवड केली जाते तसेच नियोजित संस्थेच्या नावाने बँकेत खाते उघडण्याची आणि संस्थेचे नाव राखून ठेवण्याची परवानगी मिळवण्यासाठी आवश्यक ठराव मंजूर केले जातात. संबंधीत निबंधकानी नियोजित संस्थेत एकूण किती सदनिका / गाळे आहेत आणि त्यापैकी किती सदनिका धारक / गाळेधारकांनी नियोजित संस्थेच्या पहिल्या सभेस हजर राहून विविध ठरावांना मंजूरी दिली आहे हे तपासून पाहाणे, त्याची खात्री करणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा अल्पमताने प्रस्ताव / ठराव मंजूर होऊन एक गट नोंदणीची प्रक्रिया ‘सुरु करतो. त्यानंतर दुसरा गट स्वतंत्र सभा घेऊन वेगळया नावाने संस्थेच्या नोंदणीची दुसरी प्रक्रिया सुरु करतो. नोंदणीपूर्वी निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी नोंदणीपूर्वीच्या पहिल्या सभेची संपूर्ण प्रक्रिया मूळ कागदपत्रे तपासून बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत पार पडलेली आहे याची खात्री केल्याशिवाय संस्थेचे नाव राखून ठेवण्यास आणि त्या नावाने बँकेत खाते उघडण्यास निबंधकाने परवानगी देऊ नये.
विशेषतः एसआरए/एसआरडी, म्हाडा प्रणित गृहनिर्माण संस्थांच्या संदर्भात पहिल्या सभेत होणाऱ्या कामकाजास अत्यंत महत्व असते. म्हणून एसआरए /एसआरडी, म्हाडा प्रणित संस्थांच्या नोंदणी पूर्वीच्या पहिल्या सभेत संबंधीत निबंधकाच्या कार्यालयातील प्रतिनिधी उपस्थित असणे त्या प्राधिकरणांनी बंधनकारक केलेले आहे. या सभेचे संपूर्ण कामकाजाचे चित्रफितीवर ( व्हिडीओ शुटिंग) चित्रीकरण उपलब्ध असणे बंधनकारक केलेले आहे. तरीसुद्धा या संदर्भात वाद निर्माण इ आल्यास संस्थेच्या नोंदणी होण्यापूर्वीचा वाद म्हणून सक्षम न्यायालयात दाद मागता येते.
सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीचे निकष
सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीचे निकष आणि आवश्यक असणारी कागदपत्रे संस्थांच्या प्रकारानुसार काही प्रमाणात वेगवेगळे असतात. गृहनिर्माण संस्थांचे खालीलप्रमाणे ३ प्रकार आहेत.
१. भाडेकरु सहभागीदारी गृहनिर्माण संस्था. (फ्लॅट धारकांची संस्था)
२. भाडेकरु मालकी गृहनिर्माण संस्था (प्लॉट धारकांची संस्था)
३. इतर गृहनिर्माण संस्था (गृहबांधणी / गृहतारण सहकारी गृहनिर्माण संस्था
१) भाडेकरु सहभागीदारी गृहनिर्माण संस्था नोंदणी करीता आवश्यक असणारी कागदपत्रे
- जागेबाबतचा ७/१२ चा उतारा किंवा मालमत्ता पत्रक.
- जागा बिगरशेती असलेबाबत सक्षम अधिकाऱ्याचा दाखला.
- कमाल जमिन धारणा कायदा लागू असलेला/ नसलेला बाबतचा आदेश.
- सक्षम अधिका-याने मंजूर केलेल्या बांधकामाचा नकाशा.
- बांधकाम करणेस परवानगी दिले बाबतचे पत्र.
- बांधकाम पुर्णत्वाचा दाखला.
- जागा विकसित करणेस घेतली असल्यास विकसन करारनामा.
- जागेचे कुलमुखत्यारपत्र.
- जागा निर्बंध असल्याबाबत टायटल सर्च रिपोर्ट
- प्लॅट खरेदीचा करारनामा
- रचनाकार (आर्किटेक्ट ) यांचा बांधकामाबाबतचा दाखला
- सभासदांची यादी
- संस्थेची योजना
- नाव आरक्षणाबाबतचा अर्ज.
- संस्था नोंदणीसाठी कमीत कमी १० सभासद आवश्यक राहतील.
- संस्था नोंदणी ( अ नमुना ) बाबतचा अर्ज.
- स्पष्टची माहिती (ब नमुना) तक्ता.
- सभासदांची माहिती ( क नमुना) तक्ता
- सभासदांचे हिशोबाचे पत्रक. (ड नमुना)
- संस्थेचे मुख्य प्रवर्तक यांनी रुपये १००/- च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज केलेले हमीपत्र.
- संस्थेचे बिल्डर प्रमोटर्स यांनी रुपये १००/-च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज केलेले हमीपत्र.
- सभासदांचे प्रतिज्ञापत्र. ( कमीत कमी १० प्रवर्तक यांचे प्रतिज्ञापत्र)
- मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी मान्यता दिलेल्या उपविधी दोन प्रती.
- संस्था नोंदणी झाल्यावर बालकामगार कामाला ठेवणार नसले बाबतचे मुख्य प्रवर्तक यांचे हमीपत्र.
- प्रवर्तक सभासदांचे भाग प्रत्येकी रुपये ५००/- व प्रवेश फी रुपये १००/- नाव आरक्षणास मंजूरी दिलेनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रक्कम भरले बाबतचा बॅक शिल्लकेचा दाखला.
- शासकीय कोषागारात संस्था नोंदणी फी रुपये २५००/- भरले बाबतचे चलन.
२) भाडेकरु मालकी हक्क गृहनिर्माण संस्था नोंदणी करीता आवश्यक असणारी कागदपत्रे
- जागा खरेदी कराराची नक्कल, जागेबाबतचा ७/१२ चा उतारा किंवा मालमत्ता पत्रक.
- जागा बिगरशेती असलेबाबत सक्षम अधिका-याचा दाखला.
- कमाल जमिन धारणा कायदा लागू असलेला/ नसले बाबतचा आदेश.
- जागा विकसित करणेस घेतली असल्यास विकसन करारनामा.
- जागेचे कुलमुखत्यारपत्र.
- जागा निवँध असल्याबाबत टायटल सर्च रिपोर्ट
- सक्षम अधिकारी यांचा जागा कोणत्या क्षेत्रात येते याबाबतचा झोनदाखला.
- लेआऊट प्लॅन.
- सभासदांची यादी
- संस्थेची योजना
- नाव आरक्षणाबाबतचा अर्ज.
- संस्था नोंदणीसाठी कमीत कमी १० सभासद आवश्यक राहतील.
- संस्था नोंदणी (अ नमुना )बाबतचा अर्ज.
- संस्थेची माहिती (व नमुना) चा तक्ता.
- सभासदांची माहिती ( क नमुना) तक्ता
- सभासदांचे हिशोबाचे पत्रक. (ड नमुना)
- संस्थेचे मुख्य प्रवर्तक यांनी रुपये १००/- च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईझ केले हमीपत्र (एक्स नमुना)
- संस्थेचे मुख्य प्रवर्तक यांनी रुपये १००/- च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईझ केलेले हमीपत्र. (वाय नमुना)
- संस्थेचे बिल्डर प्रमोटर्स यांनी रुपये १००/-च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज केलेले हमीपत्र. (झेड नमुना)
- सभासदांचे प्रतिज्ञापत्र. (कमीत कमी १० प्रवर्तक यांचे प्रतिज्ञापत्र)
- मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी मान्यता दिलेल्या उपविधी दोन प्रती.
- संस्था नोंदणी झाल्यावर बालकामगार कामाला ठेवणार नसले बाबतचे मुख्य प्रवर्तक यांचे हमीपत्र.
- प्रवर्तक सभासदांचे भाग प्रत्येकी रुपये ५००/- व प्रवेश फी रुपये १००/- नाव आरक्षणास मंजूरी दिलेनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रक्कम भरले बाबतचा बॅक शिल्लकेचा दाखला.
- शासकीय कोषागारात संस्था नोंदणी फी रुपये २५००/- भरले बाबतचे चलन.
३) इतर गृहनिर्माण संस्था इतर गृहनिर्माण संस्थेमध्ये गृहतारण व गृहदुरुस्ती करीता संस्था नोंदणीसाठी खालील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत.
- जागा सबंधी साठेखत / खरेदीखत/ जागा मालकी दाखला
- ७/१२ अथवा मालमत्ता रजिस्टर कार्डाचा दाखला
- नागरी कमाल जमिन धारणा कायदयान्वये जागा मुक्त केली असल्यास त्या बाबतचा सक्षम अधिका-याचा आदेश.
- जागा शासनाने किंवा निमसरकारी संस्थेने देऊ केली असल्यास त्याचे हमीपत्र.
- जागा ट्रस्ट ची असल्यास धर्मादाय आयुक्त यांचा नाहरकत दाखला
- प्लॉट बिगरशेती केलेला सक्षम अधिका-याचा दाखला
- सभासदांची यादी
- संस्थेची योजना
- नाव आरक्षणाबाबतचा अर्ज.
- संस्था नोंदणीसाठी कमीत कमी १० सभासद आवश्यक राहतील.
- संस्था नोंदणे ( अ नमुना )बाबतचा अर्ज.
- संस्थेची माहिती (व नमुना) चा तक्ता.
- सभासदांची माहिती ( क नमुना) तक्ता
- सभासदांचे हिशोबाचे पत्रक. (ड नमुना)
- संस्थेचे मुख्य प्रवर्तक यांनी रुपये १००/- च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईझ केले हमीपत्र (एक्स नमुना)
- सभासदांचे प्रतिज्ञापत्र. ( कमीत कमी १० प्रवर्तक यांचे प्रतिज्ञापत्र )
- मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी मान्यता दिलेल्या उपविधी दोन प्रती.
- संस्था नोंदणी झाल्यावर बालकामगार कामाला ठेवणार नसले बाबतचे मुख्य प्रवर्तक यांचे हमीपत्र.
- प्रवर्तक सभासदांचे भाग प्रत्येकी रुपये ५००/- व प्रवेश फी रुपये १००/- नाव आरक्षणास मंजूरी दिलेनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रक्कम भरले बाबतचा बॅक शिल्लकेचा दाखला.
- शासकीय कोषागारात संस्था नोंदणी फी रुपये २५००/- भरले बाबतचे चलन. मागासवर्गीयाच्या गृहनिर्माण संस्थांसाठी नोंदणी फी रुपये ५० एवढी आहे.
- एसआरए/ एसआरडी व म्हाडा प्रणित सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी करताना वरील निकषांची पूर्ततेबरोबरच त्या त्या प्राधिकरणांतर्गत दिलेल्या परिपत्रकीय सूचनेनुसार आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी करण्यास किंवा त्या बाबतची कार्यवाही करणेस बिल्डर प्रमोटर्स टाळाटाळ करीत असल्यास महाराष्ट्र मालकी हक्कांच्या सदनिकाबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्याची विक्री व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करणेबाबत.) अधिनियम १९६३ च्या कलम १० (१) अन्वये अधिकार दिलेले प्राधिकृत अधिकारी ( त्या त्या जिल्हयातील जिल्हा उपनिबंधक ) यांचेकडे संस्था नोंदणी करणेबाबत नमुना ६ ( नियम १२) प्रमाणे अर्ज दाखल करता येईल.
सदर प्रस्ताव दाखल करतांना खालील प्रमाणेची आवश्यकता राहिल.
- जागेबाबतचा ७/१२ चा उतारा किंवा मालमत्ता पत्रक.
- जागा बिगरशेती असलेबाबत सक्षम अधिका-याचा दाखला.
- कमाल जमिन धारणा कायदा लागू असलेला/ नसलेला बाबतचा आदेश
- सक्षम अधिका-याने मंजूर केलेल्या बांधकामाचा नकाशा.
- बांधकाम करणेस परवानगी दिले बाबतचे पत्र.
- बांधकाम पुर्णत्वाचा दाखला.
- जागा विकसित करणेस घेतली असल्यास विकसन करारनामा.
- जागेचे कुलमुखत्यारपत्र.
- जागा निर्वेध असल्याबाबत टायटल सर्च रिपोर्ट
- प्लॅट खरेदीचा करारनामा
- रचनाकार (आर्किटेक्ट ) यांचा बांधकामा बाबतचा दाखला
- सभासदांची यादी
- संस्थेची योजना
- नाव आरक्षणाबाबतचा अर्ज.
- संस्था नोंदणीसाठी कमीत कमी १० सभासद आवश्यक राहतील.
- संस्था नोंदणी ( अ नमुना ) बाबतचा अर्ज.
- संस्थेची माहिती (व नमुना) चा तक्ता.
- सभासदांची माहिती ( क नमुना) तक्ता
- सभासदांचे हिशोबाचे पत्रक. (ड नमुना)
- संस्थेचे मुख्य प्रवर्तक यांनी रुपये १००/- च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईझ केलेले हमीपत्र.
- संस्था नोंदणी करीता अर्ज केलेल्या सभासदांनी रुपये २००/-च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज केलेले हमीपत्र. (इन्डीमिनिटी बॉण्ड )
- सभासदांचे प्रतिज्ञापत्र. ( कमीत कमी १० प्रवर्तक यांचे प्रतिज्ञापत्र )
- मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी मान्यता दिलेल्या उपविधी दोन प्रती.
- संस्था नोंदणी झाल्यावर बालकामगार कामाला ठेवणार नसले बाबतचे मुख्य प्रवर्तक यांचे हमीपत्र.
- प्रवर्तक सभासदांचे भाग प्रत्येकी रुपये ५००/- व प्रवेश फी रुपये १००/- नाव आरक्षणास मंजूरी दिलेनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रक्कम भरले बाबतचा बॅक शिल्लकेचा दाखला.
- शासकीय कोषागारात संस्था नोंदणी फी रुपये २५००/- भरले बाबतचे चलन. उपरोक्त कागदपत्राची पुर्तता करुन दाखल झालेला प्रस्तावावर सक्षम अधिकारी सुनावणी घेऊन संस्था नोंदणी करणेबाबत सबंधीत अधिका-यास आदेश देऊ शकतात.
सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीची कार्यवाही:
सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी करीता उपरोक्त कागदपत्राची पुर्तता होऊन दाखल झालेल्या प्रस्तावाची सबंधीत नोंदणी अधिकारी छाननी करुन संस्था नोंदणी केलेबाबत (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९(१) अन्वये) चे प्रमाणपत्र नोंदणी केलेल्या उपविधीची प्रत संस्था नोंदणी बाबत ज्ञापन संस्थेचे मुख्य प्रवर्तक यांना देणेची व्यवस्था करतील. सदरची संस्था नोंदणी केलेबाबत चा आदेश राजपत्रात प्रसिध्द करणेबाबत शासकीय मुद्रणालय यांचेकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठविला पाहिजे.
सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी झाल्यानंतर मुख्य प्रवर्तक यांनी संस्था नोंदणी झाल्याच्या दिंनाकापासून ३ महिन्याच्या आत प्रवर्तक सभासदांची पहिली सर्वसाधारण सभा (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम ५९ अन्वये ) आयोजित केली पाहिजे व त्यात आवश्यक ते ठराव पारित केले पाहिजे. अशी सभा मुख्य प्रवर्तकांनी मुदतीत घेतली नाही तर त्या संदर्भात संबंधीत नोंदणी अधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाल्यास प्राधिकृत अधिकारी नेमून अशी सभा प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेता येईल.
संस्थेची नोंदणी करण्याचे नाकारल्यास तसा बोलका आदेश नोंदणी अधिकाऱ्यांने पारित करुन संबंधीतांना त्यांची प्रत देणे आवश्यक आहे. या निर्णयाविरुद्ध लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कलम १५२ नुसार अपिल दाखल करता येईल. संस्थेच्या नोंदणीबाबत विहित मुदतीत संस्थेचा नोंदणी प्रस्ताव निबंधकाकडे दाखल केल्यापासून दोन महिन्याच्या मुदतीत त्या संदर्भातील निर्णय घेणे आवश्यक आहे. असा निर्णय दोन महिन्याच्या मुदतीत न घेतल्यास तो प्रस्ताव लगतच्या वरिष्ठाकडे पाठविणे आवश्यक आहे.
पहिल्या सभेस सहकारी अधिकारी हजर असतीलच असे सांगता येत नाही म्हणून पहिल्या सभेस सहकारी अधिकाऱ्यांसोबत जिल्हा फेडरेशनचा पदाधिकारी / प्रतिनिधी हजर राहण्याबाबत नोंदणी संबंधीच्या ज्ञापनात नमूद करावे, जेणेकरुन कामकाजासंबंधीची त्याचप्रमाणे उपविधी संबंधीत माहिती पहिल्या सभेतच सभासदांना देता येईल.
यासभेत जिल्हा फेडरेशनचे सभासद होणेसंबंधीचा ठराव पारित करण्यात यावा.
हेही वाचा – गृहनिर्माण संस्थेची नोंदणी कधी करावी ? नोंदणीचे फायदे काय आहेत जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!