आधार सेंटर वाटपासाठी लकी ड्रॉ – परभणी जिल्हा
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आधार सेंटर (आधार संच) वाटपासाठी संबंधित आपले सरकार सेवा केंद्र चालक यांचेकडून अर्ज मागविण्यात आलेले होते. त्यानुसार पेडगाव, जांब, मानवत शहर, पाथरी, पुर्णा शहर, सेलू शहर, कुपटा, आवलगाव या 8 मंडळाच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त अर्जदार हे पात्र झालेले आहे.
सदर 8 मंडळातून पात्र अर्जदार यांचे समक्ष लकी ड्रॉ व्दारे मंडळनिहाय आधार संच मंजूर करण्यात येणार आहे. तरी आधार संच वाटपासाठी दि. 21.12.2021 रोजी सकाळी 11.00 वाजता मा. जिल्हाधिकारी यांचे कक्षात लकी ड्रॉ आयोजित केलेला आहे.
सदर लकी ड्रॉ साठी यासोबत जोडलेल्या पेडगाव, जांब, मानवत शहर, पाथरी, पुर्णा शहर, सेलू शहर, कुपटा, आवलगाव या 8 मंडळातील पात्र अर्जदारांनी वेळेवर उपस्थित राहावे. लकी ड्रॉ साठी गैरहजर अर्जदारांचा आक्षेप विचारात घेतला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
लकी ड्रॉ व्दारे आधार संच वाटप करणे बाबत प्रेस नोट आणि पात्र अर्जदार यादी:
लकी ड्रॉ व्दारे आधार संच वाटप करणे बाबत प्रेस नोट आणि पात्र अर्जदार यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!