सरकारी योजनाकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GR

पोकरा योजनेचे अनुदान आले; नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु. 293.38 कोटी निधी वितरित

हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४२५० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५१४२ गावांमध्ये ६ वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रु.४००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये पुर्ण झालेल्या कामाच्या बाबींची देयके अदा करण्याकरिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प यांचेकडून संदर्भ क्रमांक ४ च्या पत्रान्वये प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यानुसार सन २०२२-२३ या अर्थसंकल्पिय तरतूदीतून रु.२९३.३८ कोटी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु. 293.38 कोटी निधी वितरित:

सन २०२२-२३ करिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना रु. २९३.३८ कोटी (रु. दोनशे त्र्याण्णव कोटी अडतीस लाख फक्त निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असून सदर निधीपैकी बाहय हिश्श्याच्या व राज्य हिश्श्याच्या निधीचा तपशील खालीलप्रमाणे:-

बाहय हिश्श्याचा निधी(७०%)राज्य हिश्श्याचा निधी (३०%)एकूण वितरीत निधी
१९६.०० कोटी.९७.३८ कोटी.२९३.३८ कोटी.

तक्त्यात नमूद केल्यानुसार नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाकरिता बाह्य हिश्याचा रु. १९६.०० कोटी रु. एकशे शहाण्णव कोटी फक्त निधी वितरीत करण्यात येत असून तो प्रकल्पाच्या बाहय हिश्श्याच्या पुढील लेखाशिर्षाखाली सन २०२२-२३ मध्ये अर्थसंकल्पीत केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा.

या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या बाहय हिश्श्याचा रु. १९६.०० कोटी ( रु. एकशे शहाण्णव कोटी फक्त व राज्य हिश्श्याचा रु. २७.३८ कोटी (रु. सत्त्याशय कोटी अडतीस लाख फक्त) असा एकूण रु. २९३.३८ कोटी (रु. दोनशे त्र्याण्णव कोटी अडतीस लाख फक्त निधीचे कोषागारातून आहरण व वितरण करण्याकरिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी आणि वित्त विशेषज्ञ, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या ३३- अर्थसहाय्य खालील निधीचा प्रथम प्राधान्याने मागील आर्थिक वर्षातील शेतकऱ्यांची प्रलंबित देयक व सामुदायिक कामांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी विनियोग करण्यात यावा तसेच प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांनी ३३ अर्थसहाय्य या उद्दिष्टशीर्षाखाली खर्च झालेल्या रकमांचे उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनास सादर करावे.

शासन निर्णय: सन 2022-23 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.293.38 कोटी निधी वितरित करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ही वाचा – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.