वृत्त विशेषसरकारी कामेस्पर्धा परीक्षा

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु – २०२२-२३ – 11th online admission process started – 2022-23

२०२२-२३ मध्ये राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR) तसेच पुणे, पिंपरी – चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ. ११ वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार करण्यात येतील. संचालनालयाचे पत्र जान. २४१८ दि. १३/०४/२०२२ अन्वये प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक पूर्वतयारी करणेबाबत आपणास सूचित करण्यात आलेले आहे. त्यानुसार आवश्यक कार्यवाही आपण केलेली असेल.

मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी – चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ. ११ वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याने या शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या इ. ११ वी प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सोबतच्या वेळापत्रकानुसार सुरु करणेत येत आहे. त्यासाठी https://11thadmission.org.in हे पोर्टल असेल. विद्यार्थ्यांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन आपणास प्रवेश घ्यावयाच्या क्षेत्राची निवड करावी व प्रवेशासाठी आवश्यक पुढील कार्यवाही करावी.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कार्यवाहीचे टप्पे खालीलप्रमाणे असतील.

क्र.संबंधित घटककार्यवाहीचा तपशील
1उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांसाठीविद्यालय नोंदणी Jr College Registration 
(प्रवेश देण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी या संकेतस्थळावर
नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी लॉगीन आयडी व पासवर्ड
सेट करुन विद्यालयाबाबतची माहिती ऑनलाईन भरून
भरलेली माहिती शिक्षण उपसंचालक यांचेकडून प्रमाणित करुन घेणे.)
2विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन
अर्ज भरण्याचे टप्पे
1.विद्यार्थी नोंदणी Student Registration
(विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करुन लॉगीन आयडी व पासवर्ड सेट करणे)
२) प्रवेश अर्ज भाग -१ भरणे
(भरलेला अर्ज आपली माध्यमिक शाळा किंवा
मार्गदर्शन केंद्र यांचेकडून प्रमाणित करुन घेणे.)
३) पसंतीक्रम देणे, भाग -२ (Option Form) भरणे
(प्रवेश फेरीपूर्वी प्रवेशासाठी पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन निवडणे)
3प्रवेश प्रक्रियेची कार्यपद्धतीविद्यार्थ्याना कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश दोन प्रकारे घेता येतील.
१. केंद्रीय प्रवेश फेऱ्यांद्वारे Allotment मिळवून. (CAP Seats) किंवा
२. कोटांतर्गत राखीव जागांवर संबंधित विद्यालयास संपर्क साधून.
प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भाग -१ भरुन प्रमाणित
करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर (CAP Seats) करीता आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यास अर्जाचा भाग -२ पसंतीक्रम भरुन विद्यालये निवडता येतील. (किमान १ व कमाल १०)
२. विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश फेरीमध्ये Allotment देण्यात
येईल व त्यानुसार विद्यार्थ्यांनी संबंधित मिळालेल्या विद्यालयास
संपर्क साधून आपला प्रवेश दिलेल्या वेळेत निश्चित करावयाचा आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी उपलब्ध जागांची विभागणी पुढीलप्रमाणे असेल.

बिगर अल्पसंख्याकअल्पसंख्याक विद्यालये
1केंद्रीय प्रवेश फेरीद्वारे प्रवेश (CAP Seats)८५.००%३५.००%
2संस्थांतर्गत कोटा (InHouse Quota)१०.००%१०.००%
3व्यवस्थापन कोटा (Management Quota)५.००%५.००%
4अल्पसंख्याक कोटा (Minority Quota)लागू नाही५०.००%

अल्पसंख्याक कोटा फक्त अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल आणि या जागांवर अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल. इनहाऊस कोटा हा त्यांच संस्थेची माध्यमिक शाळा संबंधित विभागात असेल तर अशा माध्यमिक शाळांमधील इ.१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लागू असेल. व्यवस्थापन कोटा सर्व विद्यालयांना ऐच्छिक स्वरूपात लागू असेल.

कोणत्याही कोटांतर्गत राखीव जागा दिलेल्या वेळेत संबंधित विद्यालयांना केंद्रीय/CAP प्रवेशासाठी प्रत्यापित/ Surrender करता येतील. कोटांतर्गत प्रवेश संबंधित कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरुन गुणवत्तेनुसार देण्यात येतील. त्यासाठी कोटांतर्गत प्रवेशासाठी पसंती दर्शविलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यालयास दर्शविण्यात येईल. विद्यालयामध्ये झालेले सर्व प्रवेश त्या-त्या वेळी संकेतस्थळावर नोंदविले जातील. प्रवेश फेऱ्या व प्रत्यक्ष प्रवेशाचे कार्यवाहीबाबत सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील.

अर्ज भरतांना केवळ ज्या विद्यार्थ्यांना मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका या शहारांमधील राज्यमंडळ संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असेल अशाच विद्यार्थ्यांनी या प्रणालीच्या माध्यमातून अर्ज करावा. राज्यातील उर्वरित ठिकाणच्या प्रवेशासाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा.

यासोबत सन २०२२-२३ मध्ये मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी – चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ. ११ वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्याचे वेळापत्रक सोबत संलग्न आहे.

त्यानुसार प्रसिद्धी देऊन आवश्यक कार्यवाही आपले स्तरावरुन सुरु करणेत यावी. मार्गदर्शन केंद्र व माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित करणेबाबत आवश्यक सूचना देण्यात याव्यात. सर्व संबंधित घटकांसाठी आवश्यकतेनुसार उद्बोधन वर्ग/प्रशिक्षणाचे आयोजन करावे,

विद्यार्थ्यांकरिता अर्ज भरण्याच्या सरावासाठी विशेष सुविधा:

विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करता यावा प्रत्यक्ष अर्ज भरणे सुलभ व्हावे यासाठी दिनांक २३ मे ते २७ मे, २०२२ या कालावधीत, पोर्टलवर Demo Login सुविधा देण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याचा सराव करावा. प्रत्यक्षात अर्ज भरण्याची कार्यवाही दि. ३० मे २०२२ पासून सुरु होईल त्यापूर्वी Demo Login मध्ये भरलेली माहिती नष्ट करण्यात येईल. प्रत्यक्ष अर्ज भरण्याची कार्यवाही सुरु झालेनंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने नोंदणी करून लॉगीन आयडी व पासवर्ड जपून ठेवावयाचा आहे. याबाबत पुरेशी जागरुकता करण्यात यावी.

विद्यालयांची ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यपद्धती:

परवानगी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी पोर्टलवर करतांना शासन मान्यता पत्र, संलग्न स्तर, उपलब्ध वर्गखोल्या यांची तपासणी करुन माध्यमनिहाय प्रवेश क्षमता निश्चित करावी तसेच यापूर्वी नोंदणी झालेल्या विद्यालयांची माहिती वरीलप्रमाणे पुनश्च तपासून ती सुधारित/ अंतिम करावी. सदर विद्यालयांची माहिती EDIT करण्याची सुविधा पोर्टलवर देण्यात येईल, शासन नियमानुसार तुकडीनिहाय विहित अधिकतम प्रवेश क्षमता पोर्टल आपोआप दर्शवेल ती प्रवेश क्षमता भौतिक सुविधांचे उपलब्धतेनुसार कमी नोंदविता येईल.

ज्या विद्यालयांनी UDISE नंबर घेतलेले नाहीत त्यांना तात्पुरता लॉगीन आयडी देण्यात येईल तथापि त्यांनी UDISE No. त्वरीत मिळविणे आवश्यक राहील.

अनुदानित वर्गासाठी लागू शासन विहित शुल्क दर आपोआप दर्शविण्यात येतील. उर्वरित विना अनुदानित, स्वयंअर्थसहायित वर्गासाठी शुल्क दर विहित पद्धतीने निश्चित केले आहेत याची तपासणी करून ते पोर्टलवर अंतिम करावे.

इ. ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

(मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी – चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्र) https://11thadmission.org.in

क्र.कार्यवाहीचे टप्पेकालावधीकार्यवाही
विद्यार्थ्यासाठी नोंदणी व अर्ज भरण्याचा सराव(सरावासाठी सुविधा)
0विद्यार्थ्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग -१ भरणेसाठी विद्यार्थ्यांना सराव
Mock Demo Registration
दि. २३ मे २०२२ पासून दि. २७ मे, २०२२ पर्यंतविद्यार्थी स्वतः
टीप. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्याची सुविधा संकेतस्थळावर देण्यात येत आहे. Mock Demo मध्ये भरलेली माहिती दिनांक २८ मे, २०१२ रोजी नष्ट करण्यात येईल. यानंतर दिनांक ३० मे २०१२ पासून प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी नव्याने विद्यार्थी नोंदणी व लॉगीन करुन अर्ज भरावयाचा आहे.
विद्यार्थ्यांसाठी नोंदणी व अर्ज भाग -१ भरणे(प्रत्यक्ष कार्यवाही)
1ऑनलाईन विद्यार्थी नोंदणी व प्रवेश अर्ज भाग -१ भरणे, अर्ज
प्रमाणित करून घेणे. (प्रत्यक्ष कार्यवाही सुरु)
१) प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे. (लॉगीन आयडी व पासवर्ड मिळविणे)
२) मिळालेल्या लॉगीन आयडी व पासवर्ड वापरुन लॉगीन करणे व इ.११ वी प्रवेशासाठी अर्ज (भाग -१) भरणे,
ऑनलाईन शुल्क भरून फॉर्म लॉक करणे. अर्ज प्रमाणित करणेसाठी मार्गदर्शन केंद्र निवडणे
दिनांक ३० मे २०२२ पासूनविद्यार्थी स्वतः पालकांच्या मदतीने (शाळा मार्गदर्शन केंद्र यांची मदत घेता येईल)
2विद्यार्थ्यांनी भरलेल्या प्रवेश अर्ज भाग -१ मधील माहिती तपासून प्रमाणित करणे. विद्यार्थ्याने प्रवेश अर्जात भरलेली माहिती व सादर केलेली कागदपत्रे तपासून मार्गदर्शन केंद्र/माध्यमिक शाळा अर्ज प्रमाणित करतील. खुल्या प्रवर्गातील राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज आपोआप प्रमाणित होतील.दिनांक ३० मे २०२२ पासूनमाध्यमिक शाळा/मार्गदर्शन केंद्र
विद्यालयांसाठी नोंदणी व माहितीमध्ये दुरुस्ती
3उच्च माध्यमिक शाळा नोंदणी/दुरुस्ती, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी आपली माहिती तपासून अंतिम करणे/दुरुस्ती करणे.दिनांक ३० मे २०२२ पासून राज्यमंडळ इ. १० वी निकालापर्यंत.कनिष्ठ महाविद्यालये विभागीय शिक्षण उपसंचालक
4शिउर्स यांनी उच्च माध्यमिक शाळा माहिती प्रमाणित करणे उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती तपासून शिउर्स यांनी ऑनलाईन प्रमाणित/व्हेरिफाय करणे.दिनांक ३० मे २०२२ पासून राज्यमंडळ इ. १० वी निकालापर्यंत.विभागीय शिक्षण उपसंचालक
विद्यार्थ्यांसाठी अर्ज भाग -२ भरणे(पसंतीक्रम)
5विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग -२ मध्ये प्रवेशासाठी आपल्या पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये निवडून पसंतीक्रम नोंदविणे. (नियमित फेरी १ साठी पसंतीक्रम देणे.) तसेच कोटांतर्गत राखीव जागांवरील प्रवेशासाठी पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये निवडणे तसे ऑनलाईन नमूद करणे. (अल्पसंख्याक कोटा, इनहाऊस कोटा, व्यवस्थापन कोटा)(याबाबत तारखा त्यावेळी जाहीर करण्यात येतील)विद्यार्थी स्वतः पालकांच्या मदतीने

हेही वाचा – शाळा सुरु होण्याआधी पाठ्यपुस्तके मिळणार – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.