जिल्हा परिषदवृत्त विशेषसरकारी योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज सुरु – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पालघर

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह रमेदी वसई येथे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरु असून प्रवेश प्रक्रिया ही पुर्णपणे ऑफलाईन पध्दतीने आहे.

सदर प्रवेश अर्ज विद्यार्थ्याना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पालघर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह रमेदी वसई या वसतिगृहामधून विनामुल्य उपलब्ध करण्यात आले आहे.

वसतिगृहात प्रवर्ग निहाय खालील प्रमाणे जागा रिक्त आहेत.

  • अनुसूचित जाती- 56,
  • अनूसूचित जमाती 02,
  • विमुक्त जाती भटक्या जमाती 03,
  • आर्थिकदृष्ट्या मागास व इतर मागास प्रवर्गासाठी 03,
  • विशेष मागासवर्ग प्रवर्गासाठी 03,
  • अपंग 01,
  • अनाथ-01,

शासकीय वसतिगृहाचे सन 2022-23 साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.

इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायीक अभ्यासक्रम वगळुन) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 30/07/2022 पर्यंत:

  • पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द करणे 05/08/2022,
  • पहिल्या निवड यादी नुसार विद्यार्थ्याच्या प्रवेशाची अंतिम मुदत 14/08/2022 पर्यंत,
  • रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिध्द करणे 17/08/2022,
  • दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्याना प्रवेश देणे 27/08/2022 पर्यंत,
  • पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास सॉफ्ट अॅडमिशन देणे 31/08/2022 पर्यंत.

बी.ए.,बी.कॉम.,बी.एस.सी अश्या 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका, पदवी आणि एम.ए.,एम.कॉम., एम. एस. सी असे पदवी नतंरचे पदव्युत्तर, पदवी, पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायीक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 24/08/2022 पर्यंत:

  • पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द करणे 31/09/2022,
  • पहिल्या निवड यादी नुसार विद्यार्थ्याच्या प्रवेशाची अंतिम मुदत 10/09/2022 पर्यंत,
  • रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिध्द करणे 13/09/2022,
  • दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्याना प्रवेश देणे 23/09/2022 पर्यंत,
  • पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास सॉफ्ट अॅडमिशन देणे 28/09/2022 पर्यंत.

व्यावसायीक अभ्यासक्रम ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 30/09/2022 पर्यंत:

  • पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द करणे 03/10/2022,
  • पहिल्या निवड यादी नुसार विद्यार्थ्याच्या प्रवेशाची अंतिम मुदत 13/10/2022 पर्यंत,
  • रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिध्द करणे 15/10/2022,
  • दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्याना प्रवेश देणे 25/10/2022 पर्यंत,
  • पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास सॉफ्ट अॅडमिशन देणे 28/10/2022 पर्यंत.

पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज वसतिगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहील्यास उक्त दिलेल्या रकान्यामधील दिनांकापर्यंत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्य देऊन त्यास तात्काळ त्याच दिवशी वसतिगृहा प्रवेश दिला जाईल. (स्पॉट अॅडमिशन)

अधिक माहितीसाठी मंगेश अडसुळे 9987572868 यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पालघर यांनी केले आहे.

हेही वाचा – महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु – Apply Online For Maha DBT Scholarship

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.