वृत्त विशेष

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने सुधारित केलेली अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepuppss.in आणि https://www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असल्याची माहिती परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दि. 6 मार्च 2024 रोजी परिषदेच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली होती. अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल, असेही परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा – राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना – Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Scheme

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.