1 जानेवारी पासून बदलणार चेकने पेमेंट करण्याचा नियम

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या काही दिवसांमध्ये बँकिंग क्षेत्रातील घोटाळे मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. त्यामध्ये ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नवीन वर्षापासून चेक पेमेंट (Cheque Payment) च्या नियमात काही बदल करणार आहे. 1 जानेवारी पासून हे नियम प्रभावी आहेत. यामुळे नवीन वर्षात चेक (Cheque) पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार असल्याची माहिती आहे. 

खोट्या चेकद्वारे होणारा बँकिंग घोटाळा रोखण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे. मात्र ही सुविधा खातेधारकावर निर्भर असेल, की त्याला या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे की नाही. येत्या 1 जानेवारी 2021 पासून हा नियम लागू होत असल्याने आपण याविषयीची माहिती आणखी सविस्तर समजून घेऊ.

1 जानेवारी पासून बदलणार चेकने पेमेंट करण्याचा नियम


पॉझिटिव्ह पे सिस्टम कशी काम करणार ?

पॉझिटिव्ह पे सिस्टम एक ऑटोमॅटिक टूल आहे, जे चेकच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीवर लगाम लावेल. या प्रणालीअंतर्गत चेक देणाऱ्या व्यक्तीला SMS, मोबाइल अँप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून काही माहिती द्यावी लागेल. 

याअंतर्गत चेकची तारीख, लाभार्थ्याचं नाव, प्राप्तकर्ता आणि किती रक्कम आहे याबाबत माहिती द्यावी लागेल.

म्हणजेच  समोरच्याच्या खात्यात पेमेंट करण्याआधी ही सर्व माहिती तपासून पाहिली जाईल व जर यामध्ये काही गोंधळ असल्यास कारवाई केली जाईल. 

तसेच RBI च्या या निर्णयामुळे असुरक्षित पेमेंटची भीती सुद्धा राहणार नाही ही सुविधा देशातील सर्व बँकांना उपलब्ध करून दिली जाईल.

RBI ने दिलेल्या माहिती प्रमाणे संपूर्ण देशात पॉझिटिव्ह पे सिस्टमचे सर्व नियम 1 जानेवारी 2021 पासून लागू होतील.

50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरल्यास हा नियम लागू:

RBI च्या नियमानुसार 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम असल्यास बँक खातेदारांसाठी नवीन नियम लागू करतील. इतकंच नाही तर या सुविधेचा लाभ घेण्याचा निर्णय हा खातेधारकांचा असेल. पण वारंवार समोर येणारे घोटाळे पाहता बँका 5 लाख आणि त्यापेक्षा अधिक धनादेशांच्या बाबतीत हे अनिवार्य करू शकतात.

हेही वाचा - पोस्ट ऑफिस आणि पेमेंट बँकची सर्व्हिस आता एकाच अ‍ॅपवर, डाक-पे (DakPay)अ‍ॅप्लिकेशन झालं लाँच

या लेखात आपण चेकने पेमेंट करण्याचा नवीन नियम काय आहे तो सविस्तर पाहिले. मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !! 

Post a Comment

0 Comments